सध्या जगात अफगाणिस्तानमध्ये चाललेल्या भयंकर स्थित्यंतराची चर्चा सुरू आहे.

या घटनांमुळे भारत सर्वात जास्त प्रभावित होणार आहे पण 12 कोटी लोक बघत असलेल्या मराठी न्यूज चॅनलवरती, मराठी सोशल मीडियात त्याचा साधा लवलेशही नाही.

अफगाणिस्तानमधील अलीकडच्या घटनांबद्दलचा हा थ्रेड

1/

2001 मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर पाडल्यानंतर अमेरिकेने अफगाण तालिबान विरुद्ध युद्ध पुकारले आणि आपले व मित्र राष्ट्रांचे सैन्य तिथे तैनात केले.
या युद्धाची उद्दिष्टे काय होती आणि ती पूर्ण करण्यात अमेरिका यशस्वी ठरला का याच्यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे.

2/
अफगाणिस्तानमधील सैन्य तैनाती अमेरिकेच्या निवडणुकांमधील एक महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. कारण अमेरिकेने त्यासाठी अनेक सैनिकांचे जीव आणि करदात्यांचा अब्जावधी डॉलर्सचा पैसा खर्च केला. बदल्यात अमेरिकेला काही मिळाले नाही. आजही तालिबान, अल् कायदा, हक्कानी नेटवर्क अस्तित्वात आहेत.

3/
अफगाणिस्तानमधून सैन्य हटविण्याची चर्चा बराक ओबामांच्या काळात सुरू होती. डोनाल्ड ट्रम्पच्या काळात त्यावर अंमलबजावणी सुरू झाली. तरी अफगाणिस्तानमध्ये बऱ्याच प्रमाणावर अमेरिकन सैन्य तैनात होते. आता बिडेन सत्तेवर आल्यावर त्यास गती प्राप्त झाली.

पण इथेच खरी समस्येची सुरुवात झाली

4/
मागील काही दिवस अमेरिकेचे सैन्य माघारी जात असताना त्यांनी त्यांची काही युद्ध सामुग्री अफगाणिस्तानमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला कारण ती जीर्ण झाली होती, त्यांच्या स्टॅंडर्ड पेक्षा जुनी होती आणि ती माघारी नेण्याचा खर्च जास्त होता.

5/
परंतु आता तालिबान्यांनी त्या सामग्रीवर कब्जा मिळवला आहे आणि त्यांनी अफगाणिस्तानचा भूभाग काबीज करायला सुरुवात केली आहे.

अफगाणिस्तान भारतासाठी महत्त्वाचा देश आहे. जमिनीमार्गे भारतातून मध्य आशियात जाण्यासाठी पाकिस्तानातून जावे लागते.

6/
पाकिस्तानला वगळून मध्य आशियात जायचे झाल्यास समुद्रमार्गे इराणला जाऊन नंतर अफगाणिस्थानमार्गे तिथे जाता येते.

या मार्गाच्या बांधणीसाठी आणि इराणमधील चाहबहार बंदर च्या उभारणीत भारताने अनेक पैसे गुंतवले आहेत. अफगाणिस्तानमध्ये संसद, धरणे वगैरेच्या बांधणीत भारताने गुंतवणूक केली आहे

7/
सध्या तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला तर भारताची गुंतवणूक आणि भविष्यातले या भागातील प्रकल्प काही वर्षांसाठी संकटात पडू शकतात.
आणि भारताचा मध्य आशियात जाण्याचा पर्यायी मार्ग कायमचा बंद पडू शकतो.

8/
या घटना घडत असताना चार दिवसांपूर्वी भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अचानक रशियाला भेट दिली. या भेटीमागे मुख्य उद्देश अफगाणिस्तानच होता. अमेरिकन सैन्य परत गेल्यानंतर अफगानिस्तानवर वर्चस्व मिळवण्यासाठी रशिया आणि चीन हे प्रयत्न करतील.

9/
'नॉदर्न अलायन्सची' पुन्हा उभारणी ही भारताची मागणी असेल. अफगाणिस्तानच्या उत्तर भागात तालिबानला रोखण्यासाठी 1996 मध्ये भारतासह काही देशांनी सैन्य तैनाती केली होती त्याला 'नॉदर्न अलायन्स' असे नाव होते.

10/
तालिबानला मुख्यतः पाकिस्तान मदत करतो. भविष्यात अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा झाल्यास तालिबानी आतंकवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करू शकतात. काश्मीरच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील अनेक जवान तैनात आहेत.
त्यामुळे अफगाणिस्तानमधील आजच्या घटनांचा आपल्याशी थेट संबंध आहे.

11/
आज 11 जुलै रोजी अफगाणिस्तानमधील परिस्थिती आणखी बिघडली आहे. तालिबान्यांनी कंदाहार जवळचा प्रदेश काबीज केल्यामुळे तिथले भारतीय दूतावास बंद करून त्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खास विमानाने सुरक्षितरित्या भारतात आणण्यात आले आहे.

12/
https://t.co/bjSbbi25G7

You May Also Like